आरोग्य सेवा आणि संकटकाळातील 'दूत': जेव्हा संपूर्ण जग कोरोनाच्या जागतिक संकटात ठप्प झाले होते, तेव्हा डॉ. यादव यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता प्रत्यक्ष रणांगणात उतरून कार्य केले. कोविड लसीकरण (Vaccination) मोहिमेसाठी त्यांनी अनेक यशस्वी शिबिरे आयोजित केली. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांच्या अन्नावाचून हाल होऊ नयेत म्हणून आपल्या मित्रपरिवाराच्या साथीने त्यांनी व्यापक 'अन्नदान' उपक्रम राबवून शेकडो कुटुंबांना मायेचा आधार दिला.
विविध ठिकाणी जेथे लोकांना आपली गरज आहे हे ओळखून त्या ठिकाणी कोणत्याही निमंत्रणाची वाट न पाहता ते उपस्थित असतात 'रक्तदान हेच श्रेष्ठ दान' हा मंत्र जपत त्यांनी वेळोवेळी रक्तदान शिबिरे भरवली आणि स्वतः देखील अनेकदा रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान दिले.सामाजिक बांधिलकी आणि आपत्ती व्यवस्थापन: निसर्गाच्या कोपाने जेव्हा जेव्हा संकट ओढवले, मग तो महापूर असो वा अन्य आपत्ती; डॉ. यादव सर्वांत आधी धावून गेले. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचवण्यापासून ते गरीब रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. योग्य हॉस्पिटलचे मार्गदर्शन करणे आणि शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रशासन आणि समाज यांमधील एक भक्कम 'सेतू' म्हणून काम करतात.
सामाजिक जबाबदारीचा अर्थ : पर्यावरण संवर्धनापासून मानवतेच्या मदतीपर्यंत आजचा समाज अनेक सामाजिक, पर्यावरणीय व आर्थिक आव्हानांना सामोरा जात आहे. वाढते प्रदूषण, हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास तसेच अपघात, आजारपण व दारिद्र्यामुळे संकटात सापडलेली कुटुंबे – या सर्व समस्या समाजाच्या संवेदनशीलतेची कसोटी पाहतात. अशा परिस्थितीत सामाजिक जबाबदारी ही केवळ संकल्पना न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवणे ही काळाची गरज बनली आहे. परभणी, नांदेड व परिसरात अलीकडील काळात राबविण्यात आलेले पर्यावरण संवर्धन व मानवतावादी उपक्रम याचे उत्तम उदाहरण आहेत. जांभूळबेट संवर्धन मोहिम : निसर्गासाठी घेतलेला पुढाकार : नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रात असलेले जांभूळबेट हे जैवविविधतेने समृद्ध असे नैसर्गिक ठिकाण आहे. मात्र अलीकडच्या काळात वाढते अतिक्रमण, वृक्षतोड व दुर्लक्ष यामुळे या बेटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन नांदेड येथील वृक्षमित्र समूहाच्या पुढाकाराने “जांभूळबेट संवर्धन मोहिम” राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत जांभूळबेट येथे २०० हून अधिक देशी वृक्षांची लागवड करण...


Comments
Post a Comment
Please provide your valuable comments...