आरोग्य सेवा आणि संकटकाळातील 'दूत': जेव्हा संपूर्ण जग कोरोनाच्या जागतिक संकटात ठप्प झाले होते, तेव्हा डॉ. यादव यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता प्रत्यक्ष रणांगणात उतरून कार्य केले. कोविड लसीकरण (Vaccination) मोहिमेसाठी त्यांनी अनेक यशस्वी शिबिरे आयोजित केली. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांच्या अन्नावाचून हाल होऊ नयेत म्हणून आपल्या मित्रपरिवाराच्या साथीने त्यांनी व्यापक 'अन्नदान' उपक्रम राबवून शेकडो कुटुंबांना मायेचा आधार दिला. विविध ठिकाणी जेथे लोकांना आपली गरज आहे हे ओळखून त्या ठिकाणी कोणत्याही निमंत्रणाची वाट न पाहता ते उपस्थित असतात 'रक्तदान हेच श्रेष्ठ दान' हा मंत्र जपत त्यांनी वेळोवेळी रक्तदान शिबिरे भरवली आणि स्वतः देखील अनेकदा रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान दिले. सामाजिक बांधिलकी आणि आपत्ती व्यवस्थापन: निसर्गाच्या कोपाने जेव्हा जेव्हा संकट ओढवले, मग तो महापूर असो वा अन्य आपत्ती; डॉ. यादव सर्वांत आधी धावून गेले. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचवण्यापासून ते गरीब रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच ...
“To empower student journalists through experiential learning, ethical awareness, and a passion for truth, fostering a dynamic journalistic culture within the university.”